Archive Pages Design$type=blogging

गावाची पार्श्वभूमी

गावाची पार्श्वभूमी सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट पासून जवळच एक किलोमीटर अंतरावर आलियाबाद (ता. तुळजापूर) हे छोटेशे वसले...

गावाची पार्श्वभूमी
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट पासून जवळच एक किलोमीटर अंतरावर आलियाबाद (ता. तुळजापूर) हे छोटेशे वसलेले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 988 एवढी लोकसंख्या असून 135 कुटूंबापैकी एपीएल 118 व बीपीएल 42 कुटूंबे येथे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावचा मुख्य व्यवसाय शेती असून ज्वारी, तुर, सोयाबीन, वगैरे प्रमुख पिके घेतली जातात.
गावातील सर्व कुटूंब बंजारा समाजाची असून गावालगत एक मुस्लीम कुटूंब असून त्या कुटूंबासही गावातील सण, वार, उत्सव यात सहभागी करुन घेतले जाते व त्यांच्याही सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात बंजारा कुटूंबातील लोकांचा सक्रीय सहभाग असतो.
गावाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज आहेत. गावात जरी सर्व बंजारा समाजातील लोक असले तरी सर्व थोर पुरुषांची जयंती, उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात. जसे हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांची जयंती, उत्सव साजरे केले जातात.
गाव जरी बंजारा समाजाचे असले तरी दलित चळवळ व इतर समाजाबददलची आस्था आहे. त्याबददल माजी सरपंच मोतीरामजी चव्हाण यांचा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना दलितमित्र पुरस्कार देवुन सत्कार करण्यात आला. त्यांच्या नंतरही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या अनेक वेगवेगळया योजना राबवल्या जात असून ग्रामपंचायतीच्या या उत्कृष्ट कार्याबददल पर्यावरण रक्षणाबाबत उत्कृष्ट कार्याची पावती म्ळणून ग्रामपंचायतीस महामहीम राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते विकास रत्न पुरस्कार देवून सन 2011-12 मध्ये गौरवण्यात आले. तसेच यशवंत पंचायत राज अभियानातील कार्याबददल उस्मानाबाद जिल्हयातील द्वितीय क्रमांक मिळविला. त्याबरोबरच निर्मल ग्राम योजनेंतर्गत राबविलेल्या योजना व कार्याची दखल घेवून महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते ग्रामपंचायतीस उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला असून तो लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त अभ्यिान अंतर्गत ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे. शासनाच्या विविध योजना व धोरणांची माहिती गावातील लोकांना व्हावी म्हणून गा्रमपचायंतीने मराठवाडयाला प्रथम लोकराज्य गाव योजना राबवून प्रथम येण्याचा मान मिळविला. पर्यावरण समतोल व वीज बचत यासाठी गावात सर्वत्र सौर ऊर्जेवरील पथदिवे लावण्यात आली आहेत व ती सुस्थितीत आहेत. गावच्या सर्वांगिण विकासासाठी गावात वाचनालय व व्यायामशाळा स्थापण्यात आली. तसेच घर तेथे वृक्ष ही योजना राबविली व गावाच्या परिसरात व धरित्री विदयालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
गावातील धरित्री विदयालय नळदुर्ग व श्री कुलस्वामिनी आश्रमशाळा जळकोट असून येथे पहिली ते बारावी पर्यंत विदयार्थी शिक्षण घेत आहेत. गावातील तरुण वर्ग सुशिक्षित असून प्रौढानाही साक्षर करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केला जात असून लोकशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली असून नियमित वर्ग घेतले जात आहेत.

शासनाच्या समाज उपयोगी योजना राबवून, समतोल पर्यावरण जपून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत व नागरिक प्रयत्नशील आहेत.

COMMENTS

Name

test
false
ltr
item
Aliyabad Grampanchyat: गावाची पार्श्वभूमी
गावाची पार्श्वभूमी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-U1gxlm1jaJzM61HXP3NIyEPOZVUuHZuKrvhc7p7OKhUiAew2U_nYp4HYloidZxFL1Lp93w0SjsOOfERlD_T36voiv-DLEgS_oFggpd7vGWMgTi5yxVSgPPZ9tK1KUrpDvDHK68o9-Z8S/s320/ddcf4d06-cbd8-445a-8871-1787b702c055.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-U1gxlm1jaJzM61HXP3NIyEPOZVUuHZuKrvhc7p7OKhUiAew2U_nYp4HYloidZxFL1Lp93w0SjsOOfERlD_T36voiv-DLEgS_oFggpd7vGWMgTi5yxVSgPPZ9tK1KUrpDvDHK68o9-Z8S/s72-c/ddcf4d06-cbd8-445a-8871-1787b702c055.jpg
Aliyabad Grampanchyat
http://aliyabadgrampanchyat.blogspot.com/2017/12/blog-post.html
http://aliyabadgrampanchyat.blogspot.com/
http://aliyabadgrampanchyat.blogspot.com/
http://aliyabadgrampanchyat.blogspot.com/2017/12/blog-post.html
true
9130148507500055280
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago